कलापिनीची फेस पेंटिंग चित्रपंचमी

0

तळेगाव । कला क्षेत्रात नेहमीच नवीन नवीन उपक्रम करणार्‍या कलापिनीने यंदा फेस पेंटिंग, चेहरा रंगविणे ही संकल्पना घेऊन रंगपंचमीच्या दिवशी चित्रपंचमी साजरी केली. त्यानिमित्त आयोजित केलेल्या फेस पेंटिंग स्पर्धेला उत्तम प्रतिसाद मिळाला. अशा प्रकारच्या स्पर्धेचे हे पहिलेच वर्ष असूनही स्पर्धकांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. निरनिराळ्या कल्पना घेऊन आलेले स्पर्धक आणि तेवढ्याच तन्मयतेने चेहरा रंगविण्यासाठी बसलेल्या व्यक्ती यांचा ताळमेळ पाहावयास मिळाला.

स्पर्धेचे निकाल
स्पर्धेचे यशस्वी आयोजन विराज सवाई, विशाखा बेके, ऋतिक पाटील, रामचंद्र रानडे, यांनी आणि बालभवनच्या चित्रपंचमीचे संयोजन वृषाली आपटे, मधुवंती रानडे आणि त्याच्या सहकारी प्रशिक्षिकांनी केले. शालेय गट ः निशांत देवकर, अथर्व खांदवे, तुषार सोनावणे, उत्तेजनार्थ राहुल सोनावणे. खुला गट : प्रवीण सुतार, हिमाली भोसले, मुक्ता भावसार, उत्तेजनार्थ मानली छत्रे.