तळेगाव दाभाडे- कलापिनी बालभवनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या बालाविष्कार मंच या कार्यक्रमास बालगोपाळांचा प्रतिसाद मिळाला. कलापिनी नाट्यसंस्थेच्या बालभवनमध्ये नुकताच हा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाची सुरुवात नटराज पूजनाने झाली. यावेळी मुलांनी बालगीते, बोधकथा, गाणी, नाट्यछटा तसेच विविध नृत्याविष्कार सादर केले. कार्यक्रमासाठी रानडे, वृषाली आपटे व पल्लवी पांढरे यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. कार्यक्रमाची सांगता खाऊ देऊन करण्यात आली. कार्यक्रमास नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मधुवंती रानडे यांनी केले. आरती पोलावर व रेश्मा घोडके यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर मीरा कोण्णूर यांनी आभार मानले.