हडपसर । महाराष्ट्राची लोकधारा म्हटले की आठवण येते ती शाहीर साबळे यांची! त्यांचाच वारसा व प्रेरणा घेऊन सांस्कृतिक कला अकादमी संतोष दामोदर उभे निर्मित व नितीन सुतार सहनिर्मिती ‘कलारंग महाराष्ट्राचा’ कार्यक्रमाचा शुभारंभ मंगळवारी (दि.22) रात्री 9.30 वाजता बालगंधर्व रंगमंदिरात होत आहे. कार्यक्रमामध्ये 50 कलाकारांचा विशेष सहभाग असून पारंपरिक वाद्य, तालवाद्य, दिमडी, संबळ, ढोल,चंडा, ढोलकी, मृदुन्ग, संगीत पेटी,अशा वाद्यांचाही समावेश आहे. वासुदेव, ओवी, शेतकरी, ठाकर, धनगर, तमाशा,गण, गवळण,वाघ्या मुरळी, बदामी, गोंधळ, लावणी सादर होणार आहे.
महाराष्ट्राच्या ज्या लोककला लोप पावत चालल्या आहेत. त्याच कला नव्या ऊर्जेने रसिकांसमोर घेऊन यायचा एक प्रामाणिक प्रयत्न ह्या कालरंगाचा आहे. सांस्कृतिक कला अकादमी संगीत, नाट्य, लोककला यांचा प्रचार व प्रसार करते तसेच नवोदित कलाकारांना संधी देऊन त्यांना योग्य ते मार्गदर्शन करून त्यांना व्यासपीठ मिळवण्यासाठी मदत करते, असे अध्यक्ष धनश्री कुलकर्णी यांनी सांगितले.
ह्या कार्यक्रमाचे संतोष उभे (निर्मिती, संकल्पना), नितीन सुतार (सहनिर्मिती), अनिल जीनगरे (दिग्दर्शन) सतीश सातारकर (नृत्य दिग्दर्शन) अशोक काळे (संगीत संयोजक) व्यवस्थापन सांस्कृतिक कला अकादमी निवेदन व लेखन अभय गोखले हे करणार आहेत.