कलाल समाजातर्फे गुणवंतांचा गौरव

0

नंदुरबार । येथील समस्त कलाल समाजातर्फे एकनाथ षष्ठीनिमित्त समाजातील उच्च विद्याविभुषित तरुण, तरुणींचा सन्मान करण्यात आला. समस्त कलाल समाजातर्फे सालाबादाप्रमाणे यंदाही एकनाथ षष्ठी साजरी करण्यात आली. कन्यादान मंगल कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला समाजातील ज्येष्ठ नागरिक दगडूसा कलाल, वसंतसा कलाल, मुरलीधरसा वानखेडे, शांताबाई सोनवणे, दगाबाई कलाल, विजयाबाई जावरे, गोरखसा कलाल, भिकासा गिरनार, समाजाचे अध्यक्ष नितीन सोनवणे, यशवंतसा कलाल, गजाननसा जावरे, कैलाससा कलाल आदी व्यासपिठावर उपस्थित होते.

यांना करण्यात आले सन्मानित
याप्रसंगी समाजातील उच्च विद्याविभुषीत तरुण, तरुणींचा समाजातर्फे सत्कार करण्यात आला. या गुणवंतांना समाजातर्फे शाल, शिल्ड आणि गुच्छ देवून सन्मान करण्यात आला. या गुणवंतांमध्ये महिला व बालकल्याण प्रकल्प अधिकारी .स्वाती मच्छिंद्रसा कलाल, संस्कृती मोहनसा कलाल (एमबीबीएस,ठाणे), पद्मावती मधुसुदनसा कलाल (एपीआय, मुंबई), जागृती प्रशांतसा कचवे (राष्ट्रपतींच्या हस्ते स्काऊट-गाईडमध्ये सन्मान), डॉ. चेतन रमेशसा कलाल (डी.एम. हेपॅटोलॉजी, राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान), डॉ.ॠषिकेश भटूसा सूर्यवंशी (एमबीबीएस, शिरपूर), तुषारसा ॠषिकेशसा कलाल (पीएच.डी. शिरपूर), डॉ.कल्पेश चव्हाण (एमडीएस, नंदुरबार), अ‍ॅड. दीपाली किशोर कलाल, अ‍ॅड.वर्षा नितीन बागुल यांचा समावेश होता. पद्मावती कलाल यांचा सत्कार त्यांच्या मातोश्री लिलाबाई कलाल यांनी तर डॉ.चेतन कलाल यांचा सत्कार त्यांच्या काकू इंदुमती कलाल यांनी स्विकारला. यावेळी स्वाती कलाल, अ‍ॅड.दीपाली कलाल, डॉ.संस्कृती कलाल, डॉ.कल्पेश चव्हाण, डॉ.ॠषिकेश सूर्यवंशी, डॉ.तुषार कलाल यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच ठाणे येथील मनपाचे कार्यकारी अभियंता मोहनसा कलाल, सेवानिवृत्त उद्योग निरीक्षक भटूसा सूर्यवंशी, कैलाससा कलाल, भिकासा गिरनार, नितीन सोनवणे यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन समाजाचे उपाध्यक्ष निश्‍चल गिरनार यांनी केले. आभार सचिव रुपेश गिरनार यांनी मानले.