चोपडा प्रतिनिधी । डॉ.सुशिलाबेन शाह यांच्या व्दितीय स्मृतिदिनानिमित्त राज्यातील कलाशिक्षकांसाठी भव्य राज्यस्तरीय पोस्टर्स स्पर्धेचे आयोजन ललित कला केंद्र या कलासंस्थेमार्फत करण्यात आलेले आहे. .
स्पर्धेसाठी एकूण १९ बक्षिसे, आकर्षक प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह बक्षिसप्राप्त कला शिक्षकांना समारंभपूर्वक प्रदान केली जाणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राष्ट्रपिता महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद, गाडगेबाबा, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, साने गुरुजी,भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम या महामानवांचा जीवनचरित्रावर पोस्टर्स काढून ते ५ ऑक्टोंबर २०१८ पर्यंत भगिनी मंडळ चोपडा संचलित,ललित कला केंद्र,चोपडा जि. जळगाव पो.बॉ.नं.२० पीन कोड ४२५१०७ या पोस्टल पत्यावर पाठवावयाची आहेत.