कला व क्रीडा विषयावर झालेला अन्याय दूर करा

0

नंदुरबार । जिल्हा कला, क्रीडा शिक्षण समन्वय समिती व सहयोगी संघटनातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या नवीन शैक्षणिक वर्षात विषयवार तासिका विभागणी कला व क्रीडा विषयावर झालेला अन्याय दूर करण्यासाठी एक दिवसीय धरणे आंदोलन व शासन निर्णयाच्या परिपत्रकाची होळी करण्यात आली.

विद्याप्राधिकरण पुणे यांचे 28 एप्रिल 2017 चे परिपत्रक रद्द करावे
निवेदनात म्हटले आहे की, संचालक विद्याप्राधिकारण पुणे यांचे 28 एप्रिल 2017 चे परिपत्रक रद्द करावे, नवीन विषय योजना व तासिका नियोजन रद्द करणे राज्यातील माध्यमिक शाळांमध्ये कार्यभारनुसार पूर्ण वेळ कला व शारीरिक शिक्षक नियुक्त करण्यात यावे या विषयांचे सेवानिवृत्त झाल्यानंबतर रिक्त होणार्‍या पदावर याच विषयाच्या शिक्षक नियुक्त करण्याची मागणी केली. संच मान्यतेमध्ये विशेष कला व क्रीडा स्वतंत्रपणे दर्शविण्यात यावे दिनांक 7 आक्टोंबर 2015 च्या परिपत्रक प्रमाणे उच्च प्राथमिक शाळा मध्ये अतिथी निर्देशक पथक नियुक्त करणे बाबतच्या शासन निर्णय रद्द करणे इत्यादी मागण्या निवेदनात करण्यात आल्या.

अन्यथा परिक्षांवर बहिष्कार
आंदोलनचा पुढील टप्यात 19 जून रोजी 11 ते 5 या वेळेत शिक्षण आयुक्त कार्यालय पुणे येथे धरण आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाची दखल न घेतल्यास या शैक्षणिक वर्षापासून शासकीय सर्व क्रीडा स्पर्धा व शासकीय रेखा इंटरमिजीएट व एलिमेंट्री परिक्षांवर बहिष्कार घालण्यात येईल असा इशारा दिला आहे.