अमळनेर : येथील पू. साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयच्या वतीने देण्यात येणारा खान्देश स्तरीय पू. सानेगुरुजी स्मृती पुरस्कार अमळनेर येथील सेवानिवृत्त कला शिक्षक मार्तंड ओंकार शेलकर यांना पू. सानेगुरुजी जयंती दिना निमित्त घोषित करण्यात आला. या प्रसंगी पू. सानेगुरुजींच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात येऊन पू. साने गुरुजी जयंती साजरी करण्यात आली. ग्र्रंथालया तर्फे घोषित व देण्यात येणार्या पुरस्काराचे दुसरे वर्षे आहे.
अमळनेर येथील प्रताप हायकस्कुलचे सेवानिवृत्त कला शिक्षक मा. ओ. शेलकर वयाच्या पंच्याहत्तरीकडे वाटचाल करीत असतांनाही कला, संस्कृती, अध्यात्मक तसेच गायत्री यज्ञ व संस्कार यावर सतत व्याख्याने व प्रवचने देत असतात. कलेची मुलतत्वे व स्मरणचित्रे आदि पुस्तकांचे लिखान देखील त्यांनी केलेले आहे. पू. साने गुरुजींच्या जीवनावरील 24 प्रसंगे चित्रेही त्यांनी काढलेली आहेत. त्यांच्या साधु ह्या व्यक्ती चित्राला राष्ट्रीय पातळीवर अ ग्रेडचे बक्षिस तसेच कला विषयातील विविध निबंध लेखनास बक्षिसे मिळालेी आहेत. सन 1999 मध्ये जि.प. जळगांवद्वारा आदर्श कला शिक्षक म्हणून त्यांना गौरविण्यात आलेले आहे. ज्ञानसुखा शिक्षण परिषद जळगांव, क्षत्रिय काचमाळी समाज, जळगांव जिल्हा कला अध्यापक संघ, गायत्री परिवार ट्रस्ट, व गायत्री शक्ती पीठ अमळनेर इ. संघटनात्मक सामाजिक, शैक्षणिक, व आध्यात्मिक क्षेत्रात ते आजही सक्रिय आहेत. प्रचार व प्रसिद्धी पासून कायम दुर राहिलेलया शेलकर यांना सदर पू. साने गुरुजी स्मृती पुरस्कार, ह.भ.प. प्रसाद महाराजांच्या शुभ हस्ते व इतर मान्यवरांच्या समवेत आगामी महिन्यात प्रदान करण्यात येणार आहे. असे संस्थेचे अध्यक्ष, आत्माराम चौधरी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे. पुरस्कार घोषणा प्रसंगी संस्था सचिव भाऊसाहेब देशमुख, मनोहर महाजन, चंद्रशेखर भावसार, श्यामदास लुल्ला, संदिप सोनवणे, नगिन लोंढा, रमेश पवार, आशिष चौधरी, ग्रंथपाल, सिमा धाडकर, सुरेश जोशी, रमेश सोनार, मधुकर बाळापुरे आदि उपस्थित होते.