कलिंगड अमृता पिक पाहणीस शेतकर्‍यांचा प्रतिसाद

0

एरंडोल । येथील प्रगतीशील शेतकरी तथा व्यावसायिक राजिव जाजू यांच्या तालुक्यातील उत्राण येथील शेतात लागवड करण्यात आलेल्या कलश – सीडसच्या कलिंगड अमृता या वाणाच्या पिक पाहणी कार्यक्रमास तालुक्यातील शेतकर्‍यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. कलिंगड लागवड केलेल्या शेतास हिवारखेडा(ता.जामनेर) येथील प्रगतीशील शेतकरी व व्यापार्‍यांनी भेट देऊन लागवडी बाबत माहिती जाणून घेतली. प्रगतीशील शेतकरी राजीव जाजू यांनी उत्राण येथील शेतात पारंपारिक पिकान ऐवजी तिन एकार क्षेत्रात कलिंगड अमृता या वाणाची लागवड करून कृषी क्षेत्रात नवीन उपक्रम सुरु केला आहे.

शेतकर्‍यांनी अधिकार्‍यांकडून घेतली माहिती
कलिंगड अमृता या वाणाच्या तिन एकर क्षेत्रात लागवड केली आहे.या वाणाचे एकरी सुमारे वीस टन उत्पादन येण्याची शक्यता आहे. फळाचे साल जाड असल्यामुळे देशभरात विक्रीसाठी नेत असतांना वाहतुकीच्या काळात त्याचे नुकसान होत नाही. फळाची चव गोड व गर रवेदार आहे.तसेच या वाणावर पडणार्‍या रोगाचे प्रमाण अत्यंत कमी असून उत्पादन खर्च देखील कमी असल्याचे त्यांनी सांगितले. कलश सीड्सचे जिल्हा प्रतिनिधी संजय भोई यांचे त्यांना लागवडी बाबत मार्गदर्शन मिळाले आहे. यावेळी उपस्थित असलेल्या शेतकर्‍यांनी कलिंगड अमृता वाणाची लागवड, त्याचे नियोजन, उत्पदन, खर्च व मिळणारे उत्पन्न याबाबतची सविस्तर माहिती कंपनीच्या अधिकार्‍यांकडून जाणून घेतली. कंपनीचे विभागीय व्यवस्थापक रवींद्र कोल्हे यांनी इतर भाजी पाल्यांच्या बियाण्यांची माहिती शेतकर्‍यांना दिली.पिक पाहणी कार्यक्रमास उत्राण गुजर हद्द चे सरपंच तथा पंचायत समितीचे सदस्य अनिल महाजन,माजी सभापती सुधाकर पाटील आदी उपस्थित होते.