कल्याणमधील १०४ वर्ष जुना पूल पडण्याचे काम सुरु

0

कल्याण : कल्याणमधील १०४ वर्षं जुना पत्री पूल आज इतिहासजमा होणार आहे. वाहतुकीसाठी धोकादायक जाहीर करण्यात आल्याने हा पूल पाडण्यात येणार आहे. रेल्वे प्रशासनाने युद्धपातळीवर काम सुरु केले आहे. सकाळी ९.३० वाजता पत्री पुलाचा गर्डर उचलण्याच्या कामाला सुरुवात करण्यात येईल. दुपारी ३.३० वाजेपर्यंत हे काम चालेल. हजारो टन वजनाचा हा गर्डर उचलण्यासाठी दोन अजस्त्र क्रेन मागवण्यात आल्या आहेत.

पत्री पुलाचा गर्डर मूळ पायापासून वेगळा करुन ठेवण्यात आलाय. या सहा तासांच्या मेगा ब्लॉकदरम्यान केडीएमसी परिवहन कल्याण ते डोंबिवली, तसंच विठ्ठलवाडी ते डोंबिवली अशा जादा बसेस सोडण्यात येणार आहे.

रेल्वे सेवेवर परिणाम
या कामामुळे सकाळी ९.१५ ते दुपारी ३.४५ या कालावधीत जम्बोब्लॉक घेतला जाणार असल्याने मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णपणे विस्कळीत होणार आहे. या कालावधीत कल्याण ते ठाकुर्ली दरम्यान वाहतूक बंद ठेवली जाणार आहे. या ब्लॉकमुळे मेल, एक्स्प्रेस सेवेवर परिणाम होणार आहे.