कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार

0

कल्याण । 17 वर्षीय मुलीला निरनिराळया बहाण्याने घराबाहेर बोलावून तिला बियर पाजून दोन नराधमांनी तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना कल्याणात उघडकीस आली आहे. इतकेच नव्हे तर दोघांच्या आणखी एक मित्राने तिला खोटी सहानभूती देत लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर बलात्कार केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी सदर पीडित तरुणीने बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार केली असून या तक्रारीनुसार पोलिसांनी ओम प्रजापती, केतन नाईक व समीर कुरेशी या तीन नराधमाविरोधात गुन्हा दाखल करत त्यांचा शोध सुरू केला आहे.

पीडित मुलीशी ओम प्रजापती, केतन नाईक याच्यासह समीर कुरेशी यांच्याशी ओळख होती. फेब्रुवारी ते जून दरम्यान या तिघांनी या ओळखीचा गैरफायदा घेत तिला घराबाहेर एका ठिकाणी बोलावून तिला जबरदस्तीने बियर पाजली. त्यानंतर ओम प्रजापती, केतन नाईक या दोघांनी तिच्यावर बलात्कार केला.

पोलीस ठाण्यात गुन्हा
त्यानंतर काही दिवसांपूर्वी समीर कुरेशी याने तिला आपल्या घरी जेवण्याच्या बहाण्याने बोलावले. घडल्या प्रकाराबाबत तिला खोटी सहानभूती देत लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर बलात्कार केला. अखेर या सर्व प्रकारामुळे घाबरलेल्या पीडित मुलीने याबाबत बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून या तक्रारीनुसार पोलिसांनी ओम प्रजापती, केतन नाईक व समीर कुरेशी या तीन नराधमा विरोधात गुन्हा दाखल करत त्यांचा शोध सुरू केला असून कोणालाही अटक झाली नाही.