कल्याणमध्ये दोन दिवसात 400 किलो प्लास्टिक पिशव्या जप्त

0

कल्याण : दोन दिवसापूर्वी पालिका प्रशासन आणि महापौर राजेंद्र देवळेकर यांनी पालिका क्षेत्रातील व्यापाऱ्यांना प्लास्टिक पिशव्या वापरण्यावर बंदी घालत दुकान दाराकडील सर्व प्रकारच्या प्लास्टिक पिशव्या जप्त करत त्यांना प्रत्येकी 2500 रुपयांचा दंड ठोठावला आहे दोन दिवसात 39 हजार रुपयांचा दंड आणि 400 किलो पेक्षा अधिक प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या आहेत .या कारवाई मुळे धास्तावलेल्या दुकानदारांनी प्लास्टिक बंदी ठीक आहे मात्र जाचक कारवाई करण्यात येऊ नये अशी मागणी महापौरांकडे केली असली तरी प्रशासन मात्र प्लास्टिक बंदीच्या भूमिकेवर ठाम आहे.

न्यायालयाने प्लास्टिकच्या गंभीर प्रश्नबाबत निर्णय देताना 50 मायक्रोन पेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यावर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत मात्र मागील अनके वर्षे उलटली तरी प्रत्यक्षात या निर्णयाची प्रभावी अमलबजावणी झालेली दिसत नाही .या पार्श्वभूमीवर या कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाणे कम्बर कसली असून 15 जुलै पासून शहरात प्लस्टिक बंदीची प्रभावी अमलबजावणी करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत . पालिका प्रशासनाकडून धडक कारवाई करत दोन दिवसात 39 हजार रुपयांचा दंड आणि 400 किलो प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या आहेत यात सर्व प्रकारच्या प्लास्टिक पिशव्यांचा समावेश असल्यामुळे व्यापारि धास्तावले आहेत . आज व्यापर्यानी महापौराची भेट घेत आधीच नोटाबंदी आणि जीएसटी यामुळे व्यापार्यांच्या व्यवसायावर परिणाम झालेला असताना आता हा फटका सहन करणे व्यापर्यना कठीण होत असल्याचे म्हटले आहे. व्यापारी वापरत असलेल्या प्लास्टिक पिशव्या या 50 मायक्रॉन पेक्षा जाड असून या पिशव्यांची व्यापारी आगाऊ ऑर्डर नोंदवतात यामुळे लाखो रुपयाच्या पिशव्याची ऑर्डर व्यापर्यानी दिली आह त्यातच कापडी पिशव्यांचा खर्च परवडणारा नसून कागदी पिशव्या सहजपणे मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत नसल्यामुळे अचानक प्लास्टिक बंदीचा व्यापार्यांना मोठा फटका बसणार आहे यामुळे या प्लास्टिक बंदीसाठी नियम ठरवून द्यावा आणि 50 मायक्रॉन पेक्षा अधिक जाडीच्या पिशव्यांना अभय मिळावे अशी मागणी करत आज व्यापर्यानी महापौराची भेट घेतली मात्र प्लास्टिक बंदीचा निर्णय मागे घेतला जाणार नसल्याच्या भूमिकेवर प्रशासन ठाम असून व पालिकेच्या कारवाईस व्यापर्यानी सहकार्य करत नागरिकांना देखील प्लास्टिक वापरा पासून परावृत्त करण्यास व्यापर्यानी पुढाकार घ्यावा असे आवाहन महापौर राजेंद्र देवळेकर यांनी व्यापार्यांना केले आहे