कल्याणला वाहतूक कोंडीचा विळखा

0

कल्याण : कल्याण शहरात प्रवेश करणाऱ्या आणि बाहेर पडणाऱ्या सर्वच प्रमुख रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दिसून येत होते. त्यामुळे रक्षाबंधनाच्या सुट्टी निमित्त खरेदीसाठी घराबाहेर पडलेल्या वाहनचालकाची घोर निराशा झाली. कल्याण वाहतूक विभाग या वाहतूक कोंडी फोडण्याचा प्रयत्न करत अनेक मार्ग दुहेरी वाहतुकीसाठी बंद करण्याचा प्रयत्न देखील वाहतूक पोलिसानि केला मात्र सायंकाळी उशिरा पर्यंत वाहतूक कोंडी दिसून येत होती

कल्याण शहरात आज सकाळ पासूनच दुर्गाडी ते पत्री पूल पर्यत वाहतूक कोडी झाल्यामुळे वाहन चालकांनी पर्यायी रस्त्याचा वापर करण्यास सुरुवात केली साहजिकच शहरातील सर्वच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्यामुळे वाहन चालकाना १० मिनिटाच्या अंतरासाठी तास दोन तास लागले . उद्या रक्षा बंधनाची सुट्टी असल्यामुळे ट्रान्सपोर्ट आजच पाठविणे आवश्यक असल्यामुळे आज रस्त्यावरील जड वाहनाची संख्या कमालीची वाढल्याने शहरातील वाहतूक कोंडीत भर पडल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले. मात्र हि वाहने रस्त्यातच अडकून पडल्यामुळे वाहतूक कोंडी फोडणे जिकरीचे बनले असून रात्री उशिरा पर्यत वाहन चालकांना या कोंडीचा सामना करावा लागला.