कल्याणात आरपीआयचा मोर्चा

0

कल्याण : शासनाकडून सुशिक्षित बेरोजगारांना शासनाच्या विविध वित्तमंडळातून देण्यात आलेले व्यावसायिक कर्जमाफ करावे, व्यवसाय करण्यासाठी लागणारे कर्जासाठी आवश्यक असणारे उत्पन्नाचे जे दाखले बंद करण्यात आले आहेत.

ते तत्काळ सुरू करावेत, मागासवर्गीयांच्या उन्नतीसाठी असणार्या विविध वित्तीय महामंडळाची आर्थिक मर्यादा वाढवावी, परदेशात उच्चशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ करावी आशा मागण्यांसाठी मंगळवारी आरपीआय युवक आघाडीचे कल्याण-डोंबिवली शहर अध्यक्ष संग्राम मोरे, कार्याध्यक्ष भारत सोनवणे, ज्येष्ठ पदाधिकारी अण्णा रोकडे, माजी नगरसेवक भीमराव डोळस आदींच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यलयावर मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी मोर्चे कर्यांच्या शिष्टमंडळांने तहसीलदारांची भेट घेत निवेदन सादर करत या मागण्या सरकारपर्यंत पोचवण्याची मागणी केली. तसेच यावेळी महाराष्ट्र शासनाने शेतकर्यांची कर्जमाफी केली, त्याबद्दल सरकारचे अभिनंदन केले. मात्र ज्यांची शेती नाही त्या शेतमजुरांचे काय सवाल उपस्थित केला.