कल्याण । गणेशोत्सवासाठी फुले खरेदी करण्यासाठी कल्याण पुत्री पुलानजीक असलेल्या एपीएमसी मार्केटमध्ये उसळलेली गर्दी चोरट्यांचा पथ्यावर पडली आहे. फुल खरेदी करण्यासाठी येणार्या नागरिकांना चोरटे लक्ष करत असून त्याची नजर चुकवून मोबाईल चोरी करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. जळगाव येथे राहणारे राकेश पाटील रविवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास एपीएमसी मार्केटमध्ये फुल खरेदी करण्यासाठी गेले होते. फुले खरेदी करत असताना अज्ञात चोरट्याने त्यांची नजर चुकवून त्यांच्या खिशातील 19 हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरून पळ काढला. काही वेळाने त्यांना मोबाईल चोरीस गेल्याचे लक्षात आले. या प्रकरणी पाटील यांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून या तक्रारीनुसार पोलिसांनी चोरट्या विरोधात गुन्हा दाखल आहे.