नोबेल फाउंडेशन, महाराष्ट्र युथ फाउंडेशनची मदत
कल्याणेहोळ: ‘ज्या मातीत जन्मलो, ती माती आणि ज्या नात्यात वाढलो ती नाती विसरायची नसतात’ या उक्तीचा प्रत्यय कल्याणेहोळ या छोट्याशा खेडे गावात आला. अडीच हजार लोकवस्तीच्या या गावातील प्राथमिक शाळा कात टाकत आहे. या शाळेचे स्वरूप आता डिजिटल झाले आहे. जयदीप पाटील या तरुणाने दोन वर्षांपूर्वी येथे विज्ञानगाव चळवळ रुजवली गावातील विद्यार्थ्यांना विज्ञानाचे धडे दिले जाऊ लागले. गावातील शाळा तंत्रज्ञानाच्या पातळीवर अद्ययावत नव्हती, म्हणून नोबेल फाउंडेशनच्या वतीने शाळेला संगणक तसेच शैक्षणिक सॉफ्टवेअर भेट देण्यात आले. महाराष्ट्र युथ फाउंडेशनच्या वतीने एलईडी टीव्हीचा संच देण्यात आला. ग्रामपंचायत व सावली फाउंडेशनच्या मदतीने सुशोभीकरण केले जात आहे.
यांची होती उपस्थिती
गटविकास अधिकारी स्नेहा कुलचे पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शाळेच्या शिक्षकांना हे संच भेट देण्यात आले. याप्रसंगी लोकनियुक्त सरपंच रमेश राजाराम पाटील अध्यक्षस्थानी होते. तसेच गडचिरोली येथील सर्च प्रकल्पाच्या सामाजिक कार्यकर्त्या डॉ ऋचा शेटे, लंडन येथील डॉ. संग्राम पाटील, गटशिक्षणाधिकारी बाविस्कर साहेब, अमळनेर येथील सामाजिक कार्यकर्ते नीरज अग्रवाल, महाराष्ट्र युथ फाउंडेशनचे अध्यक्ष अक्षय कोठावदे, तत्त्वचिंतक प्रा. धर्मसिंह पाटील, स्वयंदीप प्रतिष्ठानचे संदीप पाटील, नोबेल फाउंडेशनचे विशाल पाटील, सावली फाउंडेशनचे पवन पाटील उपस्थित होते.
सीए नीरज अग्रवाल, गटशिक्षणाधिकारी बाविस्कर, सरपंच रमेश पाटील, अक्षय कोठावदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शाळेच्या मुख्याध्यापिका अपर्णा पाटील यांनी शाळेत राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. सूत्रसंचालन अपर्णा पाटील तर आभार शिक्षिका संगीता कोळेकर यांनी मानले.