कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या माजी महापौर कल्याणी पाटील यांचे स्वाईन फ्लूने निधन झाले आहे. ठाण्याच्या खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. २०१३ ते १५ दरम्यान त्या केडीएमसीच्या महापौर होत्या. गेले १५ दिवस त्या स्वाईन फ्लूने आजारी होत्या. त्यांच्यावर उपचार सुरु होते. अखेर आज त्यांची प्राणज्योती मावळली.