कल्याण- डोंबिवलीतील रिक्षा रडारवर

0

कल्याण : कल्याण-डोंबिवलीमध्ये दोन विविध ठिकाणाहून तीन रिक्षा चोरीस गेल्याच्या घटना उघडकीस आली आहे. कल्याण पश्‍चिममधील काळा तलावजवळील ठाणकर पाडा येथील पवार चाळीत राहणारे रघुनाथ पवार यांच्या मालकीच्या दोन रिक्षा आहेत. काल रात्री नेहमीप्रमाणे ते घरी आले. त्यांनी दोन्ही रिक्षा घराससमोरील जागेत उभ्या केल्या. सकाळी पुन्हा ते रिक्षाकडे गेले असता दोन्ही रिक्षा नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. आजूबाजूला शोध घेऊनही रिक्षा न सापडल्याने त्यांनी या प्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली आहे.

पोलीस तपास सुरु
दुसरी घटना डोंबिवली पूर्वेकडील ज्योती नगर झोपडपट्टी परिसरात घडली आहे. या परिसरात राहणारे भटु पाटील हे 19 जुलैला आपली रिक्षा घेऊन के.बी.विरा शाळेसमोरून जात असताना त्यांना नैसर्गिक विधी आल्याने त्यांनी शौचालयानजीक रिक्षा उभी केली. शौचालयातून परत आल्यानंतर रिक्षा तेथे नसल्याचे दिसल्याने त्यांनी रिक्षाचा शोध घेतला. मात्र रिक्षा न मिळून आल्याने अखेर त्यांनी या प्रकरणी डोंबिवली पूर्व पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.