महापालिकेच्या सभागृहात नगरसेविका मोबाईल गेम खेळण्यात व्यस्त…..

0

कल्याण : नागरी जिव्हाळ्याच्या प्रश्नी चर्चा सुरु असताना नागरिकांचे प्रतिनिधित्व करणारे लोकप्रतीनिधीना मात्र मोबाईल वर गेम खेळण्याचा मोह काही आवरता येत नसल्याचे दिसून आले . कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या महासभेत आज परिवहन समस्येवर चर्चा सुरु होती.एकीकडे नगरसेवक पोटतिडकीने परिवहन सेवा सुधारण्यासाठी सभागृहात चर्चा करत असताना दुसरीकडे बसपा च्या नगरसेविका सोनी देवराम अहिरे मात्र आपल्या मोबाईल वर गेम खेळण्यात व्यस्त असल्याचे दिसून आले .27 गावातून अहिरे या बिनविरोध निवडून आल्या आहेत.

कल्याण डोंबिवली महापालिकेची परिवहन उपक्रमाच्या सोयी सुविधांबाबत आज झालेल्या महासभेत सुमारे तासभर अत्यन्त वादग्रस्त चर्चा सुरु होती मात्र हा दरम्यान बसपाच्या नगरसेविका अहिरे यानि या चर्चेत सहभागी होण्याचे औदार्य न दाखवता मोबाईल वर गेम खेळणे पसंत केले .सदर बाब पत्रकारांच्या निदर्शनास येताच त्यांनी हा संपूर्ण प्रकार आपल्या कॅमेरात कैद केला .दरम्यान या आधीही पालिकेतील नगरसेवक गेम खेळताना किंवा व्हिडियो बघताना आढळून आले आहेत.त्यामुळ जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सभागृहात येणारे नगरसेवक हे सभागृहात किती गंभीर असतात हे पुन्हा एकदा उघड झाले आहे. ह्या बाबत नगरसेविका सोनी अहिरे बोलण्यास नकार दिला.