कल्यान : महापालिकेतील कर्मचारी रमेश पोळकर यांनी महापालिका अधिका:याकडून मानसिक त्रस दिला जात असल्याचा तसेच राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांच्यासह भाजपच्या पदाधिका:यांनी हल्ला केला होता. त्याला पोलिस प्रशासन पाठिशी घालत असल्याचा आरोप करीत महापालिका मुख्यालयाच्या आवारात ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. दरम्यांन या सगळ्य़ा प्रकरणाची तक्रार उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांकडे केली असून न्याय मिळत नसल्याने आत्मदहन करुन जीवन संपविण्याची परवानगी द्यावी अशीही मागणी न्यायाधीशांकडे केली असल्याचे पौळकर यांनी सांगितले .
कल्याण डोंबिवली महापालिकेचे कर्मचारी रमेश पौळकर यांनी आज पालिका मुख्यालयात ठिय्या आंदोलन केल्याने एकच खळबळ उडाली होती .पौळकर यांनी मुख्यालयात ठिय्या आंदोलन केल्यावर पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी पौळकर यांना ठिय्या मागे घेण्याबाबत विनंती केली मात्र पौलकर यांनी नकार दिला . पौळकर यांनी सुरक्षा अधिकारी सुहास खेर यांच्यासह अन्य सहका:यांनी त्यांचा छळ केला आहे. त्यांना मानसिक त्रस दिला आहे. मानसिक त्रस देणा:यांना प्रशासनाने पाठिशी घातले जात असल्याचा आरोप यावेळी केला . त्याचबरोबर राज्यमंत्री चव्हाण यांनी सावकर उद्यानात थाटलेले जाणता राजा नावाचे कार्यालय बेकायदेशीर असल्याची तक्रार केली होती.मात्र पालिका प्रशासनाकडून त्याची दखल घेतली जात नाही. याची विचारणा करण्यासाठी उपायुक्त सु. रा. पवार यांच्याकडे गेलो असता त्यांनी माझ्या अंगावर पेपरवेट फेकून मारला असेही पौळकर यांनी सांगितले. दरम्यानच्या काळात त्यांच्यावर राज्यमंत्री चव्हाण यांच्यासह त्यांच्या पदाधिका:यांनी प्राणघातक हल्ला केला होता. या सगळ्य़ा तक्रारीप्रकरणी पोलिसांकडून तपास केला जात नसल्याचा आरोप केला तसेच या प्रकरणी त्यांनी न्यायालयात धाव घेतली असून ही प्रकरणो न्याय प्रविष्ट आहेत. न्याय मिळत नसल्याने त्यांच्या सहनशीलतेचा अंत झाला आहे. त्यामुळे न्यायाधीशांनी आत्मदहनकरुन घेण्यास परवानगी द्यावी असे पौळकर यांनी म्हटले आहे.