कल्याण तालुक्यात स्कूल बसला अपघातात ९ जखमी

0

कल्याण । कल्याण तालुक्यातील दहागांव येथील आरोग्य केंद्राजवळ बुधवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास कल्याण पोई या एसटी महामंडळाच्या बसची गोवेली येथील महादेव रोकडे या स्कूलच्या बसला धडक दिली. या अपघातात नऊ जखमी किरकोळ झाले आहेत. सदर मुलांना गोवेली ग्रामीण रुग्णालयात उपचार करून सोडण्यात आले आहे. सकाळी ७:४५ वाजता कल्याण एसटी आगारातून पोई गावाच्या दिशेने निघालेली एसटी बस एमएच २० बीएल ०४६७ ही दहागांव बांधणे पाडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रा जवळ भरदाव वेगाने येताच समोरून आलेली महादेव रोकडे या विद्यालया च्या एमएच ०५ बीजी ३५७ या बसला समोरून धडक दिली.

चालकांना घेतले ताब्यात
स्कूल बसमध्ये एकूण ४० विद्यार्थी होते. यातील पुजा सखाराम रोहणे (१३), कविता राम रोहणे (१५), मयूर जानू कालुखे (१४), विजय रामचंद्र रोठे (१२), प्रणाली रामचंद्र ठाकरे (१४), करण उमेश रोहणे (१२), अश्‍विनी रोहणे (१४), आदित्य मच्छिंद्र बांधणे (१४) हे नऊ विद्यार्थी या आपघात किरकोळ जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी गोवेली शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर विद्यार्थ्यांना घरी सोडण्यात आले आहे. या प्रकरणी टिटवाळा पोलिसांनी चालक अशोक रामचंद्र मोरे व राजेंद्र गोविंद पवार यांना ताब्यात घेतले असून टिटवाळा पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.