कल्याण ते कसारा विभागात मेगा ब्लॉक

0
18 रोजी चार गाड्या रद्द तर सात गाड्यांचे मार्ग बदलले
भुसावळ : कल्याण ते कसारा विभागातील आंबिवली रेल्वे स्थानकावर पादचारी पुलाच्या कामासाठी 18 जानेवारी रोजी सकाळी 10 ते दुपारी तीन दरम्यान पाच तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. अप-डाऊन मार्गावरील चार गाड्या रद्द तर सात गाड्यांचे मार्ग बदलण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाने कळवले आहे.