18 रोजी चार गाड्या रद्द तर सात गाड्यांचे मार्ग बदलले
भुसावळ– कल्याण ते कसारा विभागातील आंबिवली रेल्वे स्थानकावर पादचारी पुलाच्या कामासाठी 18 जानेवारी रोजी सकाळी 10 ते दुपारी तीन दरम्यान पाच तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. अप-डाऊन मार्गावरील चार गाड्या रद्द तर सात गाड्यांचे मार्ग बदलण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाने कळवले आहे.
या गाड्या झाल्या रद्द
अप 12187 जबलपूर-छत्रपती शिवाजी टर्मिनस, अप 12118 मनमाड-एलटीटी तर डाऊन मार्गावरील 12117 एलटीटी-मनमाड, 12188 छत्रपती शिवाजी टर्मिनस-जबलपूर या गाड्या रद्द करण्यात आल्या आहे.
या गाड्यांचे बदलले मार्ग
13201 राजेंद्रनगर-एलटीटी ही गाडी मनमाड-दौंड-पुणे मार्गे धावेल. 12321 धावडा-छत्रपती शिवाजी टर्मिनस ही गाडी जळगाव-सुरत-वसई रोड-दादर मार्गे धावेल. 22110 निजामुद्दीन-एलटीटी एसी एक्स्प्रेस व 12168 वाराणसी-एलटीटी सुपरफास्ट एक्स्प्रेस जळगाव-सुरत-वसई रोड मार्गे धावेल. 11059 एलटीटी-छपरा, 12542 एलटीटी-गोरखपूर, 15548 एलटीटी-जयनगर या गाड्या वसई रोड-सुरत-जळगाव मार्गे धावतील.