कल्याण पूर्वेत घरफोडी

0

कल्याण : कल्याण पुर्वेकडील पूना लिंक रोड काटेमानिवली परिसरातील पंचशील सोसायटी मध्ये राहणारे दिलीप ममदापुर गत शुक्रवारी घराला कुलूप लावून बाहेर गेले होते ते रविवारी सकाळी घरी परतले मात्र दोन दिवस घराला कुलूप असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यानी बाथरूमच्या खिडकीतून आत प्रवेश करत घरतील रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा मिळून तब्बल 2 लाख 38 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला रविवारी सकाळी परतल्या नंतर त्यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आले त्यानंतर त्यांनी या प्रकरणी कोळशेवडी पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.