कल्याण बस स्थनाकातून बस मध्ये चढत असताना प्रवाशाचे पाकिट मारले

0

कल्याण : कल्याण पश्चिमेकडील बेतुरकर पाडा हिना आशिष अपार्टमेन्ट मध्ये राहणारे दीपक तायडे काल सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास तळोजा येथे जाण्यासाठी बस पकडण्यासाठी कल्याण बस स्थानकात आले .

काही क्षणात बस पनवेल बस आली यावेळी गर्दीतून ते बस मध्ये चढत असताना अद्न्यात चोरट्याने हातचलाखीने त्याच्या खिशातील पाकीट लांबवले .काही वेगाने त्यांना पाकीट चोरीला गेल्याचे लक्षात अमे मात्र तोपर्यंत सदर चोरट्याने त्यांच्या पाकिटातील अडीच हजार रुपये रक्कम व एटीएम कार्डाच्या माध्यमातून त्यांच्या बँक खात्यातून 20 हजार 500 रुपये लंपास केले .या प्रकरणी तायडे याने महात्मा फुले पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनि अद्न्यत चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे