कल्याण महापालिकेच्‍या `ई कचरा` मोहिमेला विद्यार्थ्‍यांची साथ

0

कल्याण : महापालिकेच्‍या `ई कचरा` मोहिमेस व महापौर राजेंद्र देवळेकर यांनी केलेल्‍या आवाहनास विद्यार्थी, पालक, मुख्‍याध्‍यापक, प्राचार्य यांनी प्रतिसाद दिला. आज एकूण ३०० किलो प्‍लॉस्टिक आणि २०० किलो ई कचरा जमा करण्‍यात आला. सर्वात जास्‍त ई- कचरा कल्‍याण पूर्वेतील शाळांमधुन तर प्‍लास्टिक कचरा डोंबिवली पश्चिम मधील शाळांमधुन जमा झाला.ई कचरा व प्‍लास्टिकच्‍या माध्‍यमातून शाळा व विद्यालयांना जो पैसा मिळणार आहे त्‍यास ‘`ग्रीन फंड ` संबोधले जाणार असून त्‍याचा वापर शाळांमधील विविध उपक्रमांस वापरण्यात येणार आहे.

महापालिका क्षेत्रात १५ जूलै पासून प्‍लास्टिक पिशव्‍यांवर बंदी करण्‍यांत आली आहे. प्‍लास्टिक पिशवी बंदी मोहिमेस मिळालेल्‍या प्रतिसादानंतर संपूर्ण महापालिका क्षेत्रातील शाळांमधुन ई कचरा व प्‍लास्टिक संकलन करणेबाबत महापौर राजेंद्र देवळेकर, आयुक्‍त पी. वेलरासू,उपमहापौर मोरेश्‍वर भोईर व पदाधिकारी यांनी घेतलेल्‍या निर्णयानंतर १४ ऑगस्‍ट रोजी शाळांमधुन विद्यार्थ्‍यांमार्फत ई कचरा संकलन करण्‍याचे ठरले. या संदर्भात बिर्ला महाविद्यालय येथे गत सप्‍ताहात सर्व शाळांच्‍या मुख्‍यध्‍यापकांची बैठक आयोजित करण्‍यांत आली होती. या बैठकित १४ ऑगस्‍ट रोजी ई कचरा व प्‍लास्टिक गोळा करण्‍याचा निर्धार करण्‍यात आला. त्‍यास अनुसरुन सोमवारी महापालिका क्षेत्रातील शाळा आणि कॉलेज मधील विद्यार्थ्‍यांनी प्‍लास्टिक आणि ई कचरा गोळा करण्यात आला. ई कचरा जमा करण्‍यासाठी महापालिकेने सर्व शाळेचे मुख्‍याध्‍यापक, प्राचार्य यांना जमा झालेला ई कचरा व प्‍लास्टिक कचरा शाळेच्‍या आवारात जमा करुन ठेवण्‍याचा सुचना देण्‍यांत आल्‍या होत्‍या. पालिका प्रशासनाने प्रत्‍येक प्रभागाकरीता १ असे १० प्रमुख आरोग्‍य निरिक्षक यांची नोडल अधिकारी म्‍हणून ई कचरा संकलनाकरीता नेमणूक केली होती. महापालिकेने जमा झालेला ई कचरा डोंबिवली पूर्व प्रगती कॉलेज समोरील पाण्‍याची टाकी येथे, कल्‍याण पूर्व येथील `ड` प्रभागक्षेत्र कार्यालय, कल्‍याण पश्चिम करीता ब प्रभागक्षेत्र कार्यालय आणि आधारवाडी अग्निशमन केंद्र अशा ४ ठिकाणी कलेक्‍शन सेंटर उघडण्‍यांत आले होते.सर्वात जास्त प्लास्टिक १९४ कि.`ब` प्रभाग अंतर्गत जमा झाला. आनंद दिघे शाळेमधून ५० कि. प्लास्टिक जमा झाले.