कल्याण । कल्याण पुर्वेकडे राहणारे हेमंत पवार रविवारी घरी परतण्यासाठी कल्याण स्टेशननजीक असलेल्या बस स्टॉपवर बसची वाट पाहत उभे होते. यावेळी नवी मुंबई महानगरपालिकेच्या एमएच 43 एच 5082 क्रमांकाची बस टर्न घेत होती. सदर बस चालकाने जोरात बस वळवल्याने पवार यांच्या पंजावरून बसचा टायर गेल्याने त्यांच्या पायाला दुखापत झाली. या प्रकरणी पवार यांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून
भरधाव बसचा धक्क्याने प्रवासी जखमी
दुसर्या एका घटनेत अंबरनाथ हाजी मलंग वाडी परिसरात भंडारी मोहल्ला येथे राहणारे समीर शेख हा कल्याण बस स्थानक येथे बसची वाट बघत उभा होता. यावेळी समोरून येणारी एमएच 05 आर 1199 क्रमांकाची बसचा समीर धक्का लागल्याने समीर खाली पडला व त्याचा पाय टायर खाली गेल्याने त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली. या प्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून हा तक्रारी नुसार पोलिसांनी केडीएमटी बस चालकाविरोधात भरधाव वेगाने व निष्काळजीपणा ने बस चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.