चाळीसगाव । ‘चला खेळू या’ या उपक्रमांतर्गत चाळीसगाव शहरस्तरीय स्पर्धा नुकत्याच संपन्न झाल्या. या स्पर्धामध्ये चंपाबाई रामरतन कळंत्री विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश प्राप्त केले. कबड्डी स्पर्धेत मुलांच्या मोठ्या गटात शाळेच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला.तसेच लांब उडी स्पर्धेत शाळेच्या हर्षल माळतकर(लहान गट-मुले)व समृद्धी जोशी (लहान गट-मुली) या विद्यार्थ्यांनी शहरी विभागातून प्रथम क्रमांक पटकाविला. या विद्यार्थ्यांचे शाळेचे चेअरमन डॉ.सुनील राजपूत आणि संस्थेचे सचिव डॉ.विनोद कोतकर यांनी अभिनंदन करून तालुकास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक प्रमोद दायमा, उपशिक्षिका दीपाली पाटील, भूषण गुंजाळ, समाधान राठोड, भूषण बाग, प्रवीण पाटील आदी उपस्थित होते.