नवी मुंबई : कळंबोली शहरातील डी मार्ट समोरील रस्त्यावर खुलेआम एका झोपड्यात देशी दारू छुप्या पद्धतीने विकली जात असल्याचे दिसुन आले असता आपला आधार फाउंडेशनने त्या ठिकाणी जात सदर प्रकार उघडकीस आणला.आणि या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली.पोलिसांनी सदरील दारूसाठा जप्त केला असून या प्रकरणी कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कळंबोली शहरातील डी मार्ट समोरील रस्त्यावर खुलेआम एका झोपड्यात देशी दारू छुप्या पद्धतीने विकली जात होत.ती झोपडी महानगरपालिकेने काही दिवसापुर्वी हटवली होती. तरी देखील त्यांनी परत तिथे झोपडी मध्ये दारु विक्री चालुच ठेवली होती.त्यामुळे बुधवारी रात्री त्याठिकाणी जाऊन रंगे हात देशी विक्री करताना आपला आधार फाउंडेशन संस्थेच्या पदाधिकारी व सदस्यांनी पकडून दिली आणि कळंबोली पोलिसांच्या ताब्यात दिले. या ठिकाणी मारलेल्या छाप्यात तब्बल 50 ते 60 देशी दारूच्या बाटल्या मिळून आल्या. अशी दारु आरोग्यासाठी फार घातक आहे हे माहीत असुन देखील लोक त्याचे सेवन करतात. या दारुमुळे अनेक घरात एक वेळची चुल पेटत नाही. विना परवाना कळंबोलीत अशा प्रकारच्या अवैध दारू विक्रीमुळे कळंबोली करांमध्यें चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्य उत्पादन शुल्क याकडे जाणीवपूर्वक व अर्थपूर्ण दुर्लक्ष करीत असल्याने सदर प्रकार कळंबोलीमध्ये सुरू आहेत. पोलिसांना दारू विक्रीवर कारवाई करण्याचा अधिकार नाही मात्र कळंबोली पोलिसांना याबाबत माहीती दिली असता त्यांनी गुन्हा दाखल करून आपला आधार फाउंडेशनला सहकार्य केले आहे.