कळमडूतील दीपक सूर्यवंशी यांचे लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश

चाळीसगाव : तालुक्यातील कळमडू येथील रहिवासी असलेल्या दीपक पितांबर सूर्यवंशी यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत इंडस्ट्रीयल इन्स्पेक्टर या पदासाठी एक्स मिल्ट्रीमॅन गटातून महाराष्ट्रातून प्रथम येण्याचा बहुमान मिळवला. ते पितांबर अमृत सूर्यवंशी यांचे चिरंजीव आहेत. त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.