चाळीसगाव । तालुक्यातील जिल्हा परिषद कन्या शाळा कळमडू येथे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून शाळा डिजीटल करण्यासाठी व शाळेतील मुलींना शिक्षणात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करता यावा तसेच ई – लर्निंग शिक्षणातून मुलींना शैक्षणिक ज्ञान सोपे व सोयीस्कर करून देण्यासाठी ‘सेवा सहयोग संस्था’ पुणे यांच्यातर्फे तीन लॅपटॉप देण्यात आले. बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानांतर्गत सहयोगतर्फे साहित्य भेट देण्यात आले आहे.
सेवा सहयोग संस्थेचे प्रतिनिधी गुणवंत सोनवणे यांच्या प्रेरणेन रोहित पटवारी, प्रशांत सोनवणे, संदिप सोनवणे, मयुर सोनवणे, योगेश सोनवणे, निलेश कोठावदे, समाधान सोनवणे, गोकुळ निकम, नितीन कोठावदे, राहूल सोनवणे, पंकज खोडके, ज्ञानेश्वर पाटील, गणेश पाटील, सचिन खोडके यांनी शाळेला 32 इंची एलईडी टी.व्ही. संच भेट दिली. कार्यक्रमास शिक्षीका रुपाली वाणी, रविंद्र बोरसे, पुनम पाटील, मनिषा सिसोदे, दिपक सनेर हे उपस्थित होते. कार्यक्रमास अमोल सोनवणे युवराज सोनवणे, पितांबर सोनवणे, ज्ञानेश्वर सोनवणे, गोपाल सोनवणे यांचेही सहकार्य लाभले.