कळमसरे। राज्य शासनाच्या शिक्षण विभागातर्फे जिल्ह्यातील सर्व शाळांची डिजीटल क्लासरुम प्रणालीद्वारे जोडण्याचे संकल्प करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्हा डिजीटल क्लासरुम तयार करण्याचे काम सुरु आहे. अमळनेर तालुक्यातील कळमसरे येथील जिल्हा परिषदेच्या मुलांच्या व मुलींच्या मराठी शाळेत डिजीटल क्लासरूम तयार करण्यात आले असून या शाळेचे उद्घाटन सोमवारी 3 रोजी करण्यात आले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाबुलाल पाटील, मुख्याध्यापक अनिल चिंधू लोहार, जितेंद्र राजपूत, अंबालाल राजपूत, अशोक चौधरी, भिकेसिंग राजपूत, किरण राजपूत, ग्राम विकास अधिकारी एस.डी. सोनवणे, हिरालाल पाटील, नरेंद्र मिस्तरी, गुलाब चौधरी, गोटू नाना, अशोक चौधरी, मनोहर चौधरी, शांताराम महाजन, मधुकर पाटील, किसनसिंग राजपूत, रत्नाकर गुरव, अर्जून भील, आशाबाई महाजन, यशोदाबाई निकम, कल्पनाबाई मिस्तरी, केंद्र प्रमुख अशोक सोनवणे, गुलाबराव पाटील आदी उपस्थित होते.
शाळा डिजीटल करण्यासाठी व एलसीडी प्रोजेक्टर घेण्यासाठी देणगी जाहीर करण्यात आली होती. यावेळी बजाज ऑटो लि. यांच्या सीएसआर फंडातून व मारवड व परिसर विकास मंचच्या सौजन्याने अमळनेर तालुक्यातील 27 शाळांना डिजीटल टी.व्ही. त्यात कळमसरे कन्या शाळेस एक युनिट देण्यात आले. त्यानिमित्ताने त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य, शिक्षकवृंद तसेच केशव बडगुजर, शिक्षक राजेंद्र पाटील, जगदीश पाटील, दिनेश निकम, दिपक पाटील, शोभा जाधव , सविता पाटील यांनी परिश्रम घेतले.