कळमसरे येथील बियर बार फोडणारे 4 जण गजाआड

0

अमळनेर । तालुक्यातील कळमसरे येथील त्रिमूर्ति बियर शॉपसह 6 दुकाने फोडणार्‍या शाना गँगच्या 4 जणांना अमलनेर न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. रविवारी 15 जानेवारी रोजी कळमसरे येथील बाबूलाल पाटील यांच्या बियर शॉपीमधून 41 हजार रोख व 1460 रुपयांच्या बियरच्या बाटल्या तर मुक्ताई पानसेंटर मधून 1200, म्हाळसा टेर्डर्स 1500 तर गुरुदत्त पानसेंटर 1000, वैष्णवी झेरॉक्समधून 1000, पंकज किराना दूकान 2000 अश्या 49150 रुपयांची चोरी झाली होती याबाबत मारवड पोलिसात भादवी. कलम 457, 380, 461 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुह्याचा तपास स्थानिक गुन्हा शाखा जळगावच्या पथकाने करुन अरोपीना अटक करुन चारही आरोपी शाना उर्फ शांताराम कोळी, योगेश कोळी, विनोद कोळी, भिकन शिंगाने यांना मारवड पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींकडून 8 हजार रूपये जमा करुन पुढील तपासासाठी एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.