रावेर- तालुक्यातील कळमोदा येथील उखर्डू शामराव पाटील (55, रा.कळमोदा, ता.रावेर) यांनी हर्निया व मुतखड्याच्या आजाराला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना 21 रोजी सकाळी सात वाजेपूर्वी उघडकीस आली. कळमोदा शिवारातील चंद्रकांत बाक्षे यांच्या शेतातील विहिरीत अज्ञात व्यक्तीचा मृतदेह असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी धाव घेतली असता बाक्षे यांचा तो मृतदेह असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी सावदा पोलिसात योगीराज शंकर पाटील (43, रा.कळमोदा) यांनी दिलेल्या खबरीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.