कळवा खाडीत उडी घेऊन तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न

0

ठाणे: उत्तर प्रदेशातून ठाण्यात आलेल्या 19 वर्षीय तरुणीने सोमवारी कळवा खाडीमध्ये उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र पालिका सुरक्षा अधिकार्‍यांच्या सतर्कतेमुळे तीला वाचवण्यात यश आले. तीला कळवा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून पोलीस तरुणीला सामाजिक संस्थेकडे सोपविणार असल्याची माहिती पालिका सहाय्यक सुरक्षा अधिकारी विनायक जाधव यांनी दिली. नंदनी शिवचरण गुप्ता असे या तरुणीचे नाव आहे.

नंदनी ही ती घरातून पळ काढून ठाण्यात पोहोचली. नंदीनीने कळवा खाडीत हातातील सामान खाडीत टाकले. त्यानंतर ती उडी घेत असतानाच सुरक्षकांनी आत्महत्येचा प्रयत्न हाणून पाडला. पालिका सुरक्षा अधिकारी जाधव यांना तरुणीने दिलेल्या माहितीनुसार, तिने आपल्याच पित्याच्या शारीरिक त्रासाला कंटाळून घरातून पळ काढला आहे. तरुणीने हातातील सामान खाडीत टाकल्याने तिच्या कुटुंबियांचे मोबाइल नंबर न मिळाल्याने त्यांच्याशी संपर्क साधता आला नसल्याचेही पालिका सहाय्यक सुरक्षा अधिकारी जाधव यांनी सांगितले. या प्रकरणाचा अधिक तपास कळवा पोलीस करत आहेत