कळसचोरी : अद्याप सुगावा नाही!

0

लोणावळा : लोणावळ्यातील कार्ला येथील एकविरा देवीच्या मंदिरावरील सोन्याचा मुलामा असलेला पंचधातूचा कळस 3 ऑक्टोबरला चोरीला गेला होता. या घटनेला 40 दिवसांपेक्षा अधिक काळ उलटूनही चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे- पाटील यांनी मंगळवारी मंदिर परिसराला भेट दिली.

स्थानिक पोलिसांना या प्रकरणात अद्याप कोणताही सुगावा सापडलेला नाही. त्यामुळे नांगरे पाटील यांनी या प्रकरणात लक्ष घातले आहे. नांगरे- पाटील यांनी एकविरा मंदिर परिसराला भेट देऊन तपासाचा आढावा घेतला. तसेच त्यांनी स्थानिक पोलिसांना तपासाचा वेग वाढवण्यासाठी सूचना दिल्या. गेल्या महिन्यात 3 ऑक्टोबरला कळसाची चोरी झाली होती. चोरीचा प्रकार सकाळी आठच्या सुमारास दर्शनासाठी आलेल्या भक्ताला लक्षात आला, त्याने मंदिर प्रशासनाला चोरीची माहिती दिली होती.–