लोणावळा । एकविरा देवी मंदिर कळस चोरी हा गंभीर स्वरुपाचा गुन्हा असून आता हा तपास पुणे ग्रामीण गुन्हे अन्वेषण विभागाकडे (क्राईम ब्रांच) सोपवला असून लवकरच चोर पकडले जातील. तसेच एकविरा कळस चोरी प्रकरणामुळे एकविरा देवस्थानचे दोन गट पडले असून यांच्यात वाद निर्माण झाला असून हा वाद शमवण्यासाठी दोन्ही गटाशी चर्चा केली आहे. दोन्ही गटांनी सामंजस्याची भूमिका घ्यावी व गाव देवस्थान वाद थांबावा. गावातील वातावरण चिघळू नये व एकविरा देवी दर्शनासाठी येणार्या भाविकांना असुरक्षित वाटू नये यासाठी सर्वांनी सामंजस्य राखावे, असे आवाहन कोल्हापूर परिक्षेत्र विशेष पोलिस महानिरिक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी कार्ला येथे केले.
एकविरा देवी कळस चोरी प्रकरणाला दिड महिना होऊन गेला असून चोरीचा छडा लागला नाही व या चोरी प्रकरणामुळे वेहरगाव ग्रामस्थ व एकविरा देवस्थानचे दोन गट पडले असून एकामेकांविरुध्द आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. यामुळे गावातील वातावरण तापले आहे. या अनुशंगाने विश्वास नांगरे पाटील यांनी कार्ला एमटीडीसी येथे बैठक घेण्यात आली होती. यावेळी नांगरे पाटील यांनी दोन्ही गटाशी स्वतंत्र बैठक घेऊन चर्चा करून त्यांची मते जाणून घेतली.पुणे स्थानिक गुन्हे शाखा क्राईम ब्रँचचे दयानंद गावडे, अप्पर पोलिस अधिक्षक पुणे तेजस्विनी सातपुते, लोणावळा पोलिस उपविभागीय अधिकारी ज्ञानेश्वर शिवथरे, लोणावळा ग्रामीण पोलिस निरिक्षिका साधना पाटील, शहर पोलिस निरिक्षक चंद्रकांत जाधव, एकविरा देवस्थानचे अनंत तरे, विजय देशमुख, काळूराम देशमुख, संजय गोविलकर, मदन भोई, सरपंच दत्तात्रय पडवळ, उपसरपंच सचिन येवले यांच्यासह वेहरगाव दहिवलीचे प्रमुख ग्रामस्थ व कोळीसंघाचे प्रमुख कार्यक्रते उपस्थित होते.