जळगाव – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील भाषा अभ्यास प्रशाळा व संशोधन केंद्राच्या वतीने शनिवारी माजी विद्यार्थी मेळावा व पालक मेळावा घेण्यात आला. यावेळी प्र-कुलगुरु प्रा.पी.पी.माहुलीकर व दैनिक सकाळचे निवासी संपादक राहुल रनाळकर हे मुख्य अतिथी होते. प्रशाळेचे संचालक प्रा.म.सु.पगारे अध्यक्षस्थानी होते. प्रा.माहुलीकर म्हणाले की, पालकांमध्ये आपला पाल्य ज्या संस्थेत शिक्षण घेत असतो त्याविषयी कमालीची उत्सुकता असते. मेळाव्याचे समन्वयक डॉ.सुनील कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. डॉ.मुक्ता महाजन यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला. सुत्रसंचालन डॉ.प्रिती सोनी व प्रा.नेत्रा उपाध्य यांनी केले. डॉ.आशुतोष पाटील यांनी आभार मानले.
भाषेच्या मुलभूत ज्ञानाला महत्व; मान्यवरांच्या अपेक्षा
भाषा प्रशाळेत अध्यापन व संशोधनाचे काम मेहनतीने व परिश्रमाने केले जात आहे. इतर प्रशाळांमधील माजी विद्यार्थी प्लेसमेंटसाठी त्या प्रशाळेला मदत करतात. तशी मदत या प्रशाळेतील माजी विद्यार्थ्यांनी देखील करायला हवी अशी अपेक्षा व्यक्त करुन प्रा.माहुलीकर यांनी पालकांनी मुलीच्या लग्नाची घाई न करता त्यांना अधिक शिक्षणाची संधी द्यावी असे मत व्यक्त केले. श्री.रनाळकर यांनी हा कार्यक्रम म्हणजे आनंदाचा सोहळा असल्याचे सांगून माध्यमामध्ये भाषेच्या मुलभूत ज्ञानाला महत्व आहे. तेव्हा भाषेच्या विद्याथ्र्यांना खूप संधी आहे. संगणकशास्त्र विभागाप्रमाणे या प्रशाळेतील विद्यार्थ्यांनी भाषा इंडस्ट्री स्थापन करावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमात यांची होती उपस्थिती
अध्यक्षीय भाषणात डॉ.म.सु.पगारे यांनी प्रशाळेत गुणवत्तेविषयी तडजोड केली जात नाही. त्यामुळे बाहेर पडलेले विद्यार्थी पायावर सक्षमपणे उभे राहतात असे सांगून प्रशाळेविषयी माहिती दिली. यावेळी हिंदी दिनानिमित्त घेण्यात आलेल्या सुंदर हस्ताक्षर, पोस्टर, सामन्यज्ञान स्पर्धेतील विजेत्यांना पुरस्कार देण्यात आले. हस्ताक्षर स्पर्धेत सविता पावरा, अतुल शिंदे, लालसिंग पावरा तर पोस्टर स्पर्धेत दीपक डूडके, रणजित आडे, सामान्यज्ञान स्पर्धेत लालसिंग पावरा, अतुल तेली यांना पारितोषिके देण्यात आली. माजी विद्याथ्र्यांच्या वतीने मनिषा महाजन, कल्पना राऊत, प्रा.हेमराज मेतकर तर पालकांच्या वतीने अब्बास डुडके, सिंधुबाई पाटील, पांडरंग तेली यांनी मनोगत व्यक्त केले.