कवयित्री बहिणाबाईंच्या जीवनपट चित्ररूप अभिनयांच्या माध्यमातून जनतेसमोर आणणार

0

माजी आमदार शिरीष चौधरींची माहिती : फैजपूर शहरातून 14 रोजी निघणार शोभायात्रा

फैजपूर- सामान्य अशिक्षित महिलेने जगाला उमेद देणारे तत्वज्ञान दिलेले सामान्य जनतेपर्यंत पोहचवू, असे प्रतिपादन माजी आमदार शिरीष चौधरी यांनी पत्रकार परीषदेत केले. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावचा नामविस्तार कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव असा झाला असून त्या निमित्ताने आनंदोत्सव साजरा करण्यासाठी तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयाच्या पुढाकाराने शुक्रवार, 14 रोजी फैजपूर शहरातून कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जीवनपटाचे चित्ररूप अभिनयांच्या माध्यमातून भव्य शोभायात्रा (चित्ररथ) चे आयोजन करण्यात आले आहे.

कुलगुरूंच्या हस्ते शोभायात्रेचे उद्घाटन
पत्रकार परीषदेत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.आर.चौधरी यांनी लोकसेवक बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांचे विद्यापीठ स्थापन मागील प्रयत्न सांगितले. प्रास्ताविकात प्रा.डॉ.गोपाळ कोल्हे यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे स्वरूप विषद केले. या शोभयात्रा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार शिरीष चौधरी असतील. उद्घाटन कुलगुरू प्रा.डॉ.पी.पी.पाटील यांच्या हस्ते होईल. प्रमुख अतिथी म्हणून माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, आमदार हरीभाऊ जावळे, व्यवस्थापन सदस्य प्रा.दिलीप रामू पाटील, व्यवस्थापन समिती सदस्य प्रा.नितीन बारी, सिनेट सदस्य डॉ.अनिल पाटील उपस्थित राहणार आहेत.

खान्देशी उत्सवाचे क्षणचित्रे विद्यार्थी साकारणार
या शोभायात्रेची सुरुवात 10.30 वाजता सुभाष चौकातून होणार आहे. शोभायात्रेत विद्यार्थी पथनाट्य, लेझीम, स्वरगंध, ढोल-ताशांवरील वेगवेगळ्या चाली, कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जीवनातील विविध पैलू विद्यार्थी आपल्या कलाकृतीतून साकार करणार आहेत. त्यात भुलाबाई, कानबाई, आखाजी, या खान्देशी उत्सवाचे क्षणचित्रे विद्यार्थी साकारतील. कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या लेवा गणबोलीत गायलेल्या कविता, चित्ररथात पीठ दळतांना कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे अभिनय विद्यार्थी साकारणार आहेत.

विविध समित्यांचे गठण
ही शोभायात्रा यशस्वी करण्यासाठी वेगवेळ्या समित्या गठित करण्यात आल्या आहेत. त्यात आयोजन समिती, रॅली आयोजन समिती, लेझीम पथक समिती, गॉर्ड ऑफ ऑनर्स समिती, बॅनर समिती, स्वच्छता समिती, आमंत्रण समिती, पाणी व्यवस्था समिती, ध्वनी स्टेज व्यवस्था समिती,फोटो गारलँड समिती, स्वागत समिती व्यवस्था समिती, रॅली दरम्यान ठिकठिकाणी व पथनाट्यादरम्यान बसण्याची व्यवस्था समिती, प्रसिद्धी समिती विदयार्थी पेहराव सुशोभीकरण समिती, वैद्यकीय समिती सूत्रसंचलन समिती, वित्त समिती इत्यादी समित्या शोभायात्रा आनंदोत्सव पार पाडण्यासाठी गठीत करण्यात आल्या आहेत.

यांची पत्रकार परीषदेला उपस्थिती
उपप्राचार्य डॉ.ए.आय.भंगाळे, उपप्राचार्य प्रा.ए.जी.सरोदे, डॉ.उदय जगताप, प्रा.डी.बी.तायडे विद्यार्थी विकास अधिकारी तथा आयोजन समिती प्रमुख डॉ.जी.जी.कोल्हे, आयोजन समिती सदस्य प्रा.आर.आर.राजपूत, डॉ.डी.एल.सूर्यवंशी, प्रसिद्धी समिती चेअरमन डॉ.ताराचंद सावसाकडे, विद्यार्थी विद्यापीठ प्रतिनिधी स्वप्नील चौधरी, नितीन सपकाळे, शेखर महाजन, चेतन इंगळे, अमोल राणे, इ. उपस्थित होते. पत्रकार परीषदेचे प्रास्ताविक प्रा.डॉ.गोपाळ कोल्हे यांनी तर आभार प्रा.राजेंद्र राजपूत यांनी मानले.