कवयित्री बहिणाबाईचे काव्य जीवनाला समृद्ध करणारे

0

धनाजी नाना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.आर.चौधरी

फैजपूर- निसर्गकन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी अवघ्या खान्देशभूमीला भूषण आहे. बहिणाबाई यांनी जीवनाचे तत्वज्ञान सोप्या आणि ओघवत्या भाषेत जगासमोर मांडले. व्यक्ती, समाज आणि निसर्ग यांच्या सुक्ष्म निरीक्षणातून सर्वसामान्यांना समजेल, असे तत्व काव्यातून मांडले. प्रत्येकाने बहिणाईच्या कवितांचा अभ्यास केला पाहिजे, असे आवाहन धनाजी नाना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.आर.चौधरी यांनी येथे केले. तापी परीसर विद्या मंडळ संचालित धनाजी नाना महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या नामविस्तार कार्यक्रमांतर्गत विद्यापीठाच्या निर्देशानुसार परीक्षेत्रातील महाविद्यालयामध्ये बहिणाबाईंच्या जीवनप्रवासाचा आणि काव्य प्रतिभेचा परिचय व्हावा या उदात्त हेतूने विविध कार्यक्रमांचे प्राचार्य डॉ.पी.आर.चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन करण्यात आले होते.

बहिणाबाई यांचा सह जीवनाचा प्रवास
प्राणीशास्त्र विभागातील प्रा.डॉ.राजश्री नेमाडे यांचे कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा निसर्गकन्या बहिणाबाई यांचा जीवनप्रवास या विषयावर काव्यरूप सादरीकरण आयोजित झाले. त्यांनी बहिणाबाईचा जीवनप्रवास कविता रुपाने, अस्सल बोलीभाषेत, संगीतमय सुरात उपस्थितांसमोर मांडला.

यांची होती उपस्थिती
उपप्राचार्य प्रा.डॉ.अनिल भंगाळे, उपप्राचार्य प्रा.डॉ.उदय जगताप, उपप्राचार्य प्रा.अनिल सरोदे, विद्यार्थी विकास विभाग समन्वयक प्रा.डॉ.गोपाळ कोल्हे, मराठी विभागप्रमुख प्रा.डॉ.मनोहर सुरवाडे , राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा.डॉ.शरद बिर्‍हाडे, सांस्कृतिक व कला मंडळाचे प्रमुख प्रा.दिलीप तायडे, प्रा.उत्पल चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.

यांनी घेतले परीश्रम
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ.सिंधू भंगाळे तर सूत्रसंचलन प्रा.डॉ.सरला तडवी यांनी केले. आभार प्रा.डॉ.गोपाळ कोल्हे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.लेफ्ट. राजेंद्र राजपूत, प्रा.रवी केसूर, प्रा.सतीश पाटील, प्रा.डॉ.जी.एस.मारतळे, नितीन सपकाळे, शेखर महाजन आदींनी परीश्रम घेतले.