शहादा । तालुक्यातील कवळीथ येथील बंधार्यातुन निघणार्या कालव्यातील पाणी गेल्या 30 वर्षात सोनवद – वरुळ कानडी या गावापर्यंत पोहोचलेले नव्हते. अनेक वर्षापासून रखडलेले अपूर्णावस्थेतील या कालव्याचे काम महाराष्ट्र शासन जलयुक्त शिवार अभियान, जेएनपीटी व आर्ट ऑफ लिव्हिंग यांचा सहकार्याने फक्त 35 दिवसात पूर्ण केल्याने फक्त दोन दिवसात सोनवद त.श. वरुळ कानडी या गावापर्यंत पोहोचले. त्यामुळे या परिसरातील शेतकरी व गावकर्यांमध्ये आनंदाचे व जल्लोषाचे वातावरण निर्माण झालेले आहे. याची दखल घेवुन जिल्हाधिकारी यांनी 30 जुलै रोजी पाहणी केली व वरुळ कानडी येथे जलपुजन केले.
आर्ट ऑफ लिव्हिंगच्या कामांचे कौतूक
याप्रसंगी प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर नायब तहसिलदार देवरे आर्ट ऑफ लिविंगचे किशोर पाटील, हरीश पाटील, आय.जे.पाटील, सुधाकर सैंदाणे, तसेच वरुळ, कानडी सोनवद त.श., मोहिदा त.श., येथील सरपंच उपसरपंच ग्रा.पं.सदस्य, ग्रामस्थ, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हाधिकारीनी सांगितले की आर्ट ऑफ लिव्हिंग या सस्थेमार्फत श्री श्री रविशंकर हे भारतभर जलजागृती अभियान राबवित आहेत. सस्थेमार्फत नदी, कालवे, नाले, तलाव, धरण यामधील गाळ काढण्याचे काम मोठ्या प्रमाणात होत आहे. पाणी साठविण्यासाठी जास्तीत जास्त पाणी जिरविण्यासाठी काम सुरु आहे. आपल्या परिसरातही गेल्यावर्षी कवळीथ बंधारा व 5.5 एकर तलावाचे गाळ काढण्याचे काम झाले. सदर कालव्यातील गाळ काढण्याचे काम झाल्यामुळे पाण्याचा प्रवाह चार पटीने वाढल्यामुळे लोणखेडा पुरूषोत्तम नगर डोंगरगाव सोनवद त.श., मोहिदा त.श., वरुळ कानडी या गावातील पाझर तलाव केटीवेअर या आठ दिवसात 50 टक्के पेक्षा जास्ती भरले आहेत.