कवाडे नगर जागेसाठी पीआरपीचे आंदोलन

0

भुसावळ । शहरातील रेल्वे हद्दीतील कवाडे नगर येथे शासनातर्फे पर्यटन स्थळ जाहिर करण्यात आले आहे. मात्र याचे निकष पायदळी तुडविण्यात आले आहे. तसेच येथील झोपडपट्टी उठविण्यात येणार असल्याने या विरोधात पिपल्स रिपब्लिकन पार्टीतर्फे प्रांताधिकारी कार्यालयासमोर मंगळवार 21 रोजी आंदोलन करण्यात आले. यासंदर्भात प्रांताधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले असून या मागण्यांमध्ये येथील झोपडपट्टी उठविण्यात येवू नये, 1995 पुर्वीच्या झोपड्या कायम ठेवाव्यात, वनविभागाने ही कारवाई केली असून या कारवाईला सुरुवात झाल्यास तीव्र विरोध करण्यात येईल.

येथील वडर समाजबांधवांना हक्काचे घर हवे तसेच बाजारपेठ पोलीस ठाण्याशेजारील जागेवर शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्याचा ठराव पालिकेत झाला आहे. त्यामुळे पालिकेने यासंदर्भात तातडीने अंमलबजावणी करावी. पंचायत समिती प्रकरणात प्रतिमा लावल्याप्रकरणी गटविकास अधिकारी मावळे यांनी अज्ञातांविरुध्द तक्रार दिली असून पोलीस प्रशासनाने आरोपींना पाठीशी न घालता तातडीने गुन्हे दाखल करावे तसेच गटविकास अधिकार्‍यांना निलंबित करण्यात यावे.

यांची होती उपस्थिती
वराडसिम येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसविण्यासंदर्भात ग्रामपंचायतीने ठरावाची अंमलबजावणी करावी आदी मागण्या करण्यात आल्या आहे. याप्रसंगी नगरसेवक उल्हास पगारे, पीआरपी प्रमुख जगन सोनवणे, रिपाइं आठवले गटाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रमेश मकासरेे यांनीदेखील मागणी लावून धरली असून निवेदनावर संगिता खरे, बाळा सोनवणे, महेंद्र पाटील, शरद सोनवणे, गणेश सपकाळे, राकेश वाकडे यांंच्या स्वाक्षर्‍या आहे.