दौंड । स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर खुटबाव येथील भैरवनाथ विद्यालयात सामूहिक कवायतींचा सराव सुरू असल्याचे दिसून येते. येत्या मंगळवारी (दि.15) देशाचा 70 वा स्वातंत्र्यदिन साजरा होत आहे. या निमित्ताने परिसरातील शाळा -विद्यालयात या दिनाच्या तयारीचा सराव सुरू आहे.
खुटबाव विद्यालय हे दौंड तालुक्यातील विविध उपक्रम साजरे करणारे विद्यालय म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी या दिवसाचे औचित्य साधून अनेक कार्यक्रम साजरे होणार असल्याची माहिती प्राचार्य राजेंद्र भोसले यांनी दिली. प्रभातफेरी, स्काऊट गाईडच्या मुलांचे संचलन, समूहगीत, देशभक्तीपर गीते, सामूहिक कवायत आदी कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात येणार असल्याची माहिती भोसले यांनी दिली.