कवि संमेलनातून डॉ.बाबासाहेब आंबेंडकरांना अभिवादन

0

जळगाव। सत्यशोधक साहित्य संमेलन जळगाव आयोजित डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती पूर्व संध्येला कवी संमेलनाचे आयोजन स्व बबन बाहेती महाविद्यालयात करण्यात आले होते. कवितेच्या माध्यातून बाबासाहेबांच्या आठवणी कवितांच्या माध्यमातून ताज्या करण्यात आल्या. युवक कवी,सह जेष्ठ साहत्यिकांनी यावेळी आयोजित कार्यक्रमात उपस्थिती लावली होती. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सुशील पगारिया तसेच प्रमुख मान्यवर म्हणून डॉ शिरीष पाटील , विजयकुमार मौर्य डॉ मिलिंद बागुल आदी उपस्थित होते. डॉ बाबासाहेबांच्या आठवणींना उजळणी देत त्यांना आदरांजली वाहण्यात आली.

22 साहित्यकांनी घेतला सहभाग
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निम्मित आयोजित कवी संमेलनात मोट्या संख्येने जळगाव मधील जेष्ठ साहित्यिक ,तरुण वर्गाचा सहभाग होता. यामध्ये भास्करराव चव्हाण , गोविंद देवरे ,राजेंद्र काशीराम पारे, एम. के सोनवने,वाय. डी. वाघमारे ,अशोक पारधे , सतीश पवार,आर. डी.कोळी,पी. जी. बागुल , प्रफ्फुल पाटील ,किशोर नेवे,संदीप सपकाळे, दर्शन गायकवाड ,सचिन दीपक पगारे, रा.शे साळूंखे, एस. पी.ठाकूर, डॉ सुषमा तायडे, पुष्पां साळवे,घनशाम खोब्रागडे, राणा कापुरे आदी कवी , साहित्यिकांनी संमेलनामध्ये सहभाग घेतला होता.

पंतप्रधान मोदींचे मानले आभार
दलित वर्गासाठी डॉ बाबासाहबांचे योगदान मोठे असून त्यांनी केलेल्या समाज सेवेच्या वारसा याबाबत कवीनी सादर केलेल्या कवितान मध्ये विशेष मांडणी करण्यात आली होती. आताच्या नवीन आलेल्या सरकारने डॉ बाबासाहेब आंबडेकर यांचा जयंती दिवस हा ज्ञान दिवस म्हणून साजरी करण्यात यावी अशी घोषणा केली असून त्या बद्दल साहित्यिक व कवी वर्गातून सादरीकरण करताना असून सरकारचे अभिनंदन करण्यात आले. तसेच राज्य शासनाने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी इंदू मिलच्या कामात पुढाकार घेतल्याने राज्य सरकारचे देखील यावेळी आभार मानण्यात आले.