कवी केशवसुत यांच्या स्मृतिप्रित्यर्थ कवी संमेलन

0

भातखंडे । येथे अखिल भारतीय खान्देश साहित्य अकादमी व मराठी साहित्य परिषद भडगाव शाखा तसेच जवाहर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय गिरड आयोजित कवीवर्य केशवसुत यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ खुले कवी संमेलन घेण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्राचार्य पी.सी.धनगर, व्यवस्थापन समितीचे सदस्य भास्कर पाटील, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शिवाजी पाटील, डॉ.वाल्मिक अहिरे, प्रा.एस.एस.पाटील, प्रा.सुरेश कोळी, वि.ना.बागुल आदी उपस्थित होते. यावेळी कवींनी बहारदार कवितेचे सादरीकरण केले.

नामदेव महाजन यांनी (लेकरं रडतस तुकडासाठे), विनोद बागुल,(मास्तर) शैलेंद्र बिरारी,(मामा नी पोर), एकनाथ गोफणेजी(रस्ता म्हणतो माझी काय चूक) गोरी माटी बोलीतील कविता विषेश गाजली, राम जाधव (मुके घाव), गो.शि.म्हसकर (आम्ही शेकडो प्रश्‍न निर्माण केले), जगन्नाथ मोरे (आईची ममता), अमित पाटील (निर्भया), रमेश धनगर (गावमान गावमां), डॉ.वाल्मिक अहिरे यांनी (काया काया पोरी संगे लगीन लावलं मामानं) ही कविता सादर केली. कवी संमेलनात बाळद येथील कवी वि.ना.बागुल यांना पहिला कवीवर्य केशवसुत स्मृती काव्यरत्न पुरस्कार मराठी साहित्य परीषदेच्या वतीने देण्यात आला. त्यांचा ’तुझ्या आठवणी’ घुसमट’ हे काव्य संग्रह प्रकाशित आहेत. यशस्वीतेसाठी सचिन बोरसे, अमित पाटील, बी.एन.पाटील, डी.डी.भोसले, पी.एस.भोसले, विकास पाटील, काशीनाथ पाटील, पी.डी.पाटील यांनी परीश्रम घेतले. रमेश धनगर यांनी सुत्रसंचालन तर सचिन बोरसे यांनी आभार मानले.