हडपसर : भाषा ही प्रवाही असून ती ज्ञानवाहक असते व ग्रंथ हे ज्ञानाचे संकलन करतात म्हणून ग्रंथ हे सर्वश्रेष्ठ असतात. मराठी भाषेची समृद्धी मराठीतील ग्रंथातून जतन झाली असून त्याचे वाचन करणे गरजेचे असते. मराठी भाषेचा गौरव करणे हे मराठी मातीतील प्रत्येकाचे कर्तव्य असून मराठी भाषेचा सर्वांना अभिमान असला पाहिजे, असे प्रतिपादनजेष्ठ कवी संदीपान पवार यांनी केले.
अण्णासाहेब मगर महाविद्यालयात मराठी राजभाषा दिनानिमित्त जेष्ठ कवी संदीपान पवार यांचे व्याख्यान आणि सत्काराचे आयोजन करण्यात आलं होते. व्याख्यानाचा विषय होता, बडोदा ईथं भरलेल्या 91 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अनुभव सदर कार्यक्रमाला महाविद्यालयाच्या प्राचार्या डाँ शर्मिला चौधरी, उपप्राचार्य डाँ भाऊसाहेब बेंद्रे, उपप्राचार्य अनिल जगताप, प्राध्यापक प्रबोधिनीच्या प्रमुख डाँ चांदेकर मँडम, कार्यालय अधिक्षक श्री एम. एन कदम, वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख प्रा. शिंदे एस. डी, मराठी विभागप्रमुख प्रा. ससाणेसर, प्रा. डाँ. नाना झगडे, डाँ. शिरुरकर डी. डी., डाँ. दानाई-तांभाळे, डाँ. मेघना भोसले, डाँ शुभांगी औटी आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. बडोदा येथील संमेलनाचे अनुभव कथन करुन काव्य रचनाही सादर केल्या.