ऑकलंड । भारतीय बॅडमिंटनपटू पी. कश्यप आणि सिरील वर्मा यांचे न्यूझीलंड ग्रापी बॅडमिंटन स्पर्धेतील आव्हान संपष्टात आले. तिसर्या फेरीच्या लढतीत भारताच्याच सौरभ वर्माने पारुपल्ली कश्यपचा 21-18, 13-21, 21-16 असा पराभव केला.
उपांत्यपूर्व फेरीत सौरभची लढत हाँगकाँगच्या ली चेऊक वियुशी होईल. अन्य लढतीत तैपईच्या हुंग लू ने सिरील वर्मावर विजय मिळवला. हुंग ने सिरीलचा 21-13, 21-14 असा पराभव केला.अमेरिकन आोपन विजेत्या प्रणॉय आणि सौरभने आगेकूच कायम राखली. प्रणॉयने हाँगकाँगच्या वेई नानचा 21-18, 21-19 असा पराभव करत उपांत्यपूर्व स्थान मिळवले. पुढच्या फेरीत प्रणॉयची लढत तैपईच्या लिन यू सेनशी होईल.