कष्टकरी मजुरांचा पंचायत समितीवर मोर्चा

0

जळगाव– पंतप्रधान आवास योजनेतर्गंत गरिबांना सवलतीच्या दरात घरकुलसाठी जागा उपलब्ध करुन द्यावी यासह विविध मागण्यांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष जिल्हा शाखेतर्फे कष्टकरी मजुरांनी पंचायत समितीवर मोर्चा काढला.दरम्यान,गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. मनरेगा रोजगार हमी कायद्याची अंमलबजावणी करावी,कामगारांना 700 रुपये मजुरी द्यावी,आसोदा,ममुराबादसह जळगाव तालुक्यातील सरकारी गावठाण जागा घरकुलासाठी सवलतीच्या दरात द्यावी,घरकुलसाठी अनुदान उपलब्ध करुन द्यावे,सामाजिक योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी आदी मागण्यांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष जिल्हा शाखेतर्फे कष्टकरी मजुरांनी श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानापासून जळगाव पंचायत समितीवर मोर्चा काढला.

गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी कॉ,विनोद अढाळके,कॉ.प्रकाश चौधरी,वंदना सपकाळे,रंजना सपकाळे,दिपाली सुर्यवंशी,लोटन पाटील,राजेश्री सोनवणे,तुषार पाटील,आनंदा पाटील,शंकुतला खैरनार आदी उपस्थित होते.