कष्टकरी वर्गाच्या विकासासाठी ठोस धोरण राबवावे : प्रा. आढाव

0

सम्राट विचार मंच पुणे यांच्यावतीने राबविला उपक्रम

खडकी : असंघटीत क्षेत्रातील कष्टकरी वर्गाचा विकास साध्य करण्याकरिता लोकप्रतिनिधींच्या माध्यमातुन शासनाने कल्याणकारी योजना राबविण्याकामी पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे प्रा. डॉ. विलास आढाव यांनी केले. सम्राट विचार मंच पुणे यांच्यावतीने विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणारे आणि 10 वी व 12 वी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ नुकताच बोपोडी येथे आयोजित करण्यात आला होता. त्या प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. आढाव बोलत होते. याप्रसंगी अ‍ॅड. रमेश पवळे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रमेश नाईक, युवा नेते उमेश चव्हाण, प्रकाश ढोणे, उद्योजक एच. एम. शिंदे, पत्रकार रमाकांत आरेकर, राहुल शिंदे, सविता भोसले, कांता ढोणे, पोपट खंडागळे आदी उपस्थित होते.

वंचित घटकांचा विकास ही गरज
डॉ. आढाव पुढे म्हणाले की, लोकप्रतिनिधींनी वंचित घटकाचा विकास घडवून आणण्यासाठी जास्तीतजास्त प्रयत्न करणे काळाची गरज बनली आहे. न्यायालयीन समस्ये बाबत सामान्यजनांना येणार्‍या अडीअडचणी सोडविण्यासाठी व कौटुंबिक कलह मिटविण्याकरिता आपण सदैव प्रयत्न करु असे, अ‍ॅड.चांदने या वेळी बोलले. सम्राट विचार मंचाचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय सुर्यवंशी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. पुणे कौटुंबिक न्यायालय बार असोशिएशनच्या अध्यक्षपदी अ‍ॅड. वैशाली चांदने तसेच अण्णाभाऊ साठे समाज भुषण पुरस्काराने सन्मानित केलेले रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) पुणे शहर अध्यक्ष महेंन्द्र कांबळे आणि 10 च्या परिक्षेत कौतुकास्पद गुण प्राप्त करणारे विद्यार्थी हर्षदा गायकवाड (95 टक्के) जान्हवी थनवाल (88 टक्के) प्रफुल बगाडे (87 टक्के) स्नेहा रणापिसे (78 टक्के ) रोणित पाचारणे (73 टक्के) व दिक्षा घागट या विद्यार्थ्यांचा प्रा. डॉ. आढाव व अ‍ॅड. चांदने यांच्या हस्ते संविधान प्रत व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सतिश घोडके यांनी केले तर आभार अशोक गायकवाड यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्या करिता जीवन म्हस्के, भगवान कांबळे, कै.पी.घागट, उमेश कांबळे, योगेश सुर्यवंशी आदींनी विशेष परिश्रम घेतले.