कसबा पेठेतील जागा कशासाठी हवी?

0

पुणे : कसबा पेठेतील जागा मॉलसाठी हवी आहे की मेट्रोसाठी हे स्पष्टपणे सांगा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महामेट्रोकडे केली असून त्याचे योग्य उत्तर द्या, अन्यथा मनसे न्याय्य हक्कासाठी लढेल, असा इशाराही दिला आहे.

मेट्रो विरोधात कसब्यात आंदोलन करण्यात आले. आपल्या रहात्या जागेवर मेट्रोचे स्टेशन होणार आहे आणि ते मेट्रोचे स्टेशन नको या भावनेतून आंदोलन झाले आहे. वास्तवात तिथे स्टेशन होणार नसून भव्य मॉल होणार आहे, असा दावा मनसेचे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी केला आहे. मॉल उभारण्याकरीता घरे, मंदिरे, मशिदी, इतर स्थावर मालमत्ता मेट्रोला मॉलसाठी हवी आहे की स्टेशनसाठी हे एकदा सांगून टाका. मेट्रोला मॉल बांधायचा असेल तर सर्वसामांन्याच्या घरावर का येता? असा प्रश्‍न उपस्थित करत या भागात सरदारांचे वाडे रिकामे पडलेत त्याला हात लावून दाखवा. आराखड्यात कसब्यात दाखवलेला मॉल हा अगोदर दुसर्‍या जागी दाखवला होता त्यामुळे त्यात अजूनही बदल होऊ शकतो तो करा, असेही शिंदे यांनी म्हटले आहे.