भुसावळ : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील कल्याण- कसारा खंडात शनिवार, 13 व रविवार, 14 रोजी दोन दिवस रात्री ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात आल्यामुळे आठ गाड्या रद्द करण्यात आल्या असून शनिवारच्या रात्री दोनपासून सकाळी 7.25 पर्यत तीन स्टेशनवर हा ब्लॉक राहणार आहे. शनिवारी रात्री 2.15 वाजेपासून ते सकाळी 7.15 वाजेपर्यत खडावली आणि वाशिंद रेल्वे स्टेशन दरम्यान क्रासिंग गेट 61 मध्ये आरएच गर्डर काम केले जाणार आहे. पहाटे 2.25 ते सपाळी 7.25 या वेळात आसनगाव आणि आटगाव स्टेशनदरम्यान लेव्हल क्रॉसिंग गेटचे (नंबर 68) आरएच गर्डरचे काम केले जाणार आहे. तर पहाटे दोन ते सकाळी 4.30 वाजेच्या सुमारास शहाडमध्ये एफओबीचे गर्डर टाकले जाणार आहे. याचा फटका रेल्वे गाड्यांना बसणार आहे. रेल्वेकडून आठ गाड्या रद्द करण्यात आल्या असून दोन गाड्यांचे वेळापत्रकात बदल केला आहे. दोन गाड्यांच्या मार्गात बदल केला आहे. या गाड्या बदल करून चालविल्या जाणार आहे.
या रेल्वे गाड्या केल्या रद्द
गाडी क्रमांक डाउन 01141 मुंबई-आदिलाबाद विशेष गाडी 12 मार्च रोजी रद्द करण्यात आली. अप 01142 आदिलाबाद मुंबई विशेष गाडी 13 मार्च रोजी रद्द करण्यात आली. डाऊन 07057 मुंबई-सिकंदराबाद विशेष गाडी 14 मार्च रोजी रद्द करण्यात आली. अप 07058 सिकंदराबाद-मुंबई विशेष गाडी 13 मार्च रोजी रद्द करण्यात आली. डाउन 07618 मुंबई-नांदेड विशेष गाडी 14 मार्च रोजी रद्द करण्यात आली. अप 07617 नांदेड-मुंबई विशेष गाडी 13 मार्च रोजी रद्द करण्यात आली. अप 02198 जबलपूर-कोइम्बमतूर विशेष गाडी 13 मार्च रोजी रद्द करण्यात आली. डाऊन 02197 कोईम्बतूर-जबलपूर विशेष गाडी 15 मार्च रोजी रद्द करण्यात आली.
अप मार्गावरील गाड्यांचे री-शेडयुलिंग
अप 02112 अमरावती-मुंबई ही गाडी 13 मार्चला अमरावती स्टेशनपासून तीन तास री-शेडूलिंग करण्यात येईल. अप 02106 गोंदिया-मुंबई 13 मार्च रोजी गोंदीया स्टेशनपासून तीन तास विलंबाने सुटणार आहे.
या गाड्यांच्या मार्गात बदल
अप 02541 गोरखपूर-लोकमान्य टिळक विशेष गाडी गोरखपूर स्टेशनवरून 12 मार्च रोजी जळगाव-वसई रोडमार्गे लोकमान्य टिळक टर्मिनसला जाईल. या गाडीला भिवंडी रोड येथे थांबा देण्यात आला आहे तसेच हावडा-मुंबई विशेष गाडी हावडा स्टेशनवरून 12 मार्च रोजी जळगाव-वसई रोड मार्गे लोकमान्य टिळक टर्मिनसला जाईल. या गाडीला भिवंडी रोड येथे थांबा दिला आहे.
स्पेशल ट्रेनला येथे थांबा
ब्लॉकच्या पार्श्वभूमीवर स्पेशल ट्रेनला ईगतपुरी आणि कल्याण स्टेशन दरम्यान एक तास ते तीन तासापर्यत थांबविण्यात येईल. यामुळे या गाड्या त्यांच्या नियोजीत स्थानकावर वेळेपेक्षा विलंबाने पोचतील. यात गाडी क्रमांक 01237 नागपुर-मडगाँव स्पेशल गाडी 13 मार्च रोजी तसेच गाडी क्रमांक 02618 हजरत निजामुद्दीन-एर्नाकुलम स्पेशल गाडी 13 मार्च रोजी तसेच गाडी क्रमांक 02138 फिरोजपुर-सीएसएमटी स्पेशल गाडी 12 मार्च व गाडी क्रमांक 02190 नागपूर-सीएसएमटी स्पेशल 13 मार्च रोजी विलंबाने पोहोचणार आहे.
डाउन स्पेशल ट्रेन या सेक्शनमध्ये थांबविणार
कल्याण आणि टिटवाळा दरम्यान आणि निलजे स्टेशन मध्ये स्पेशल ट्रेन थांबविण्यात येणार आहे. यात गाडी क्रमांक 02259 मुंबई-हावडा स्पेशल 14 मार्च, गाडी क्रमांक 02129 एलटीटी-प्रयागराज स्पेशल गाडी 14 मार्च, गाडी क्रमांक 05017 एलटीटी-गोरखपूर स्पेशल गाडी 14 मार्च, गाडी क्रमांक 01236 मडगांव-नागपूर विशेष गाडी 13 मार्चला थांबविणार आहे.